Friday, December 2, 2022

खेड्यापाड्यांची खंत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

खेड्यापाड्यांची खंत

दिल्ली नंतर गल्ली तापली,
सुरुवात झाली खोड्याला.
इलेक्शन आले रे आले...
खेडे म्हणाले खेड्याला.

जे शहरो शहरी होते,
तेच आपल्याकडेही सारे आहे.
तिकडे जे वाहत होते,
त्याचेच आपल्याकडेही वारे आहे.

इलेक्शनचे सगळे छक्के पंजे,
आपल्या इथेही खेळले जातात!
कुणी हारतात, कुणी जिंकतात,
पण गावचे गावपण पोळले जातात!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6650
दैनिक पुण्यनगरी
2डिसेंबर2022

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...