Monday, December 19, 2022

चित्र विचित्र... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

चित्र विचित्र

गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
एकच चित्र दिसते आहे.
लोकशाहीच्या मानगुटीवर
ठोकशाही बसते आहे.

लोकसभेच्या उदाहरणाला,
ग्राम पंचायत साक्षी आहे !
ठोकशाहीच्या कमाणीला,
घराणेशाहीची नक्षी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6664
दैनिक पुण्यनगरी
18डिसेंबर2022

 


No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...