Thursday, December 22, 2022

टांगा पलटी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

टांगा पलटी

हारणाऱ्याला कळेना,
आपण कसे हरलो आहोत?
जिंकणाऱ्याला कळेना,
विजयी कसे ठरलो आहोत?

ग्रामपंचायतच्या निकालाचे,
प्रत्येक गावागावात कोडे आहे!
जसा टांगा झाला पलटी,
तसेच फरार घोडे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8127
दैनिक झुंजार नेता
22डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...