Saturday, December 3, 2022

सत्य विचार.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सत्य विचार

सत्य साधेसुधे नाही,
सत्य तुम्हाला नडू शकते.
आपल्या माणसापासूनही,
सत्य तुम्हाला तोडू शकते.

सत्य कुणाला रुचत नाही,
सत्य कुणाला पचत नाही.
मोडेल पण वाकणार नाही,
सत्य कुणाला मेचत नाही.

सत्य जसे उघडे असते,
तसे सत्य नागडे असते !
सत्याची किंमत सांगतो,
सत्य सर्वात महागडे असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6651
दैनिक पुण्यनगरी
3डिसेंबर2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026