Thursday, December 22, 2022

रंगभंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

रंगभंग

जशी बिकिनी भगवी आहे,
तशी लंगोटीही भगवी आहे.
नाहीतरी कपड्याच्या आत,
सगळी दुनियाच नागवी आहे.

जी दुनिया रंगीबेरंगी आहे,
तिला उगीच बेरंगी करू नका!
जाती आणि धर्मांच्या चौकटीत,
निष्पाप रंग फ्रेम करू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6669
दैनिक पुण्यनगरी
22डिसेंबर2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...