Monday, December 12, 2022

महापुरुषांसाठी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

महापुरुषांसाठी

ज्याला जे पाहिजे ते,
बेताल बडबडू लागले.
आपले राजकारण बघून,
महापुरुष गडबडू लागले.

कुठे राईचा पर्वत आहे,
कुठे दोरीचा साप आहे.
जणू नेत्यांचे महापुरुषत्व,
हाच जणू शाप आहे.

कोण मोठा?कोण छोटा?
वाद आणि दंगल नको!
महापुरुष झेपले नाहीत तर,
निदान त्यांची टिंगल नको!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6659
दैनिक पुण्यनगरी
12डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...