Tuesday, December 6, 2022

तोंडसुख... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

तोंडसुख

नको तेवढे उतले जाते,
नको तेवढे मातले जाते.
नको तिथे तोंड घालून,
नको तसे तोंडसुख घेतले जाते.

ते हवे तसे तोंडसुख घेतात,
याचेच तर खरे दुःख आहे !
आपलेच दात,आपलेच ओठ,
कुणा कुणाचा चेहरा मख्ख आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6654
दैनिक पुण्यनगरी
6डिसेंबर2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...