Monday, December 19, 2022

लोकशाही सत्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

लोकशाही सत्य

मतदान यंत्राच्या शिट्ट्या ऐकूण,
लोकशाही गालातल्या गालात हसली.
आपली वाताहत,
तिला प्रत्येक गावागावात दिसली.

लोकांना मतदान मागू नका,
मतदान करायला शिकवले पाहिजे!
लोकशाहीचे कर्ज,
मतदान साक्षर होवून चुकवले पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6665
दैनिक पुण्यनगरी
19डिसेंबर2022
 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...