Wednesday, December 7, 2022

समाज संघटन.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

समाज संघटन

प्रत्येक जातीय संघटकांचा,
वेगळाच थाट आणि घाट आहे.
जातीय संघटनांची तर,
सध्या जाती-जातीत लाट आहे.

समाज एक होण्याऐवजी,
संघटनांमध्ये वाटला जातो आहे.
थोडीफार कुरबुर झाली की,
नवा संसार थाटला जातो आहे.

आपल्या नेतृत्वाच्या हौसेपोटी,
कोणताही समाज वापरू नका!
एकमेकांना जोपरून काढीत,
कोणताही समाज ढोपरू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6655
दैनिक पुण्यनगरी
7डिसेंबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...