Saturday, December 3, 2022

मतदान विक्री

आजची वात्रटिका
-----------------------

मतदान विक्री

एकाचे बघून दुसरे,
आपोआप सोकले जातात
चांगला भाव येताच,
मतदार विकले जातात.

रोखीने आणि चोखीने,
मतदानाची विक्री आहे.
मतदान गरागरा फिरवते,
अशी मतदानाची चक्री आहे.

घेणारे गोड,देणारे गोड,
सगळी गोडी गुलाबी आहे!
आपल्या मात्र पोटात दुखते,
सगळा मामला जुलाबी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8113
दैनिक झुंजार नेता
3 डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19 मार्च 2026 l वर्ष- पाचवे l अंक -219 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...