Monday, December 5, 2022

ऐतिहासिक सत्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

ऐतिहासिक सत्य

कुणी इतिहास उजळू लागले,
कुणी इतिहास पाजळू लागले.
काही काळ्या जिभेवाले,
इतिहासालाच काजळू लागले.

कुणी थोबाडावर आपटूनही,
आपली मुक्ताफळे उधळतो आहे.
कुणी इतिहासाची खिल्ली उडवीत,
वाट्टेल तसे खिदळतो आहे.

जो कुणी इतिहासाला,
इतिहास म्हणून पहात नाही!
त्याला धडा शिकवल्याशिवाय,
इतिहास कधीही रहात नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6653
दैनिक पुण्यनगरी
5डिसेंबर2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...