Sunday, December 4, 2022

व्यावहारिक सत्य.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
व्यावहारिक सत्य
सच्चाई आणि प्रामाणिकतेचा,
आजकाल मोठा जोक होतो आहे.
खोट्या नाट्याचा व्यवहार मात्र,
आजकाल रोखठोक होतो आहे.
प्रामाणिकता नकटी झाली,
सच्चाईसुद्धा आजकाल मिंधी आहे!
तो तो हात धुवून घेणारच,
ज्याच्याकडे आयतीच संधी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8114
दैनिक झुंजार नेता
4डिसेंबर2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...