Thursday, December 8, 2022

मिथ्याग्रह... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
मिथ्याग्रह
जिकडे बघावे तिकडे,
सगळी फसवाफसवी आहे.
खरे म्हणून खोट्याचीच,
सगळी ठसवाठसवी आहे.
ज्याला जसे पाहिजे तसे,
जो तो भासवतो आहे.
खोटे आधार देत देत,
जो तो बूड बसवतो आहे.
लावला जोर कितीही,
तरीही खोटे रेटेनासे झाले!
खऱ्याचीच झाली पंचाईत,
खरेही खरे वाटेनासे झाले!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6656
दैनिक पुण्यनगरी
8डिसेंबर2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...