Friday, December 9, 2022

लोकमताची आकडेवारी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

लोकमताची आकडेवारी

विरोधाला विरोध करूनही,
लोकांचा कौल मान्य करावा लागतो.
शेवटी लोकशाहीत,
आकड्यांचाच पुरावा धरावा लागतो.

कुणाशीही कितीही वाकडे असो,
त्याला आकडे सरळ करू शकतात!
विरोधाला विरोधाची तीव्रता,
फक्त आकडे विरळ करू शकतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6657
दैनिक पुण्यनगरी
9डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...