Monday, December 5, 2022

सिमोल्लंघन ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सिमोल्लंघन

कुणी काढतोय वेड्यात,
कुणाकडून जनतेचा मामा आहे.
ज्याने त्याने ओलांडलेली,
आपापली सीमा आहे.

सीमावादाची लढाई,
ज्याने त्याने टाळायला हवी!
एखाद्याने सीमा ओलांडली तर,
दुसऱ्याने सीमा पाळायला हवी!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8115
दैनिक झुंजार नेता
5डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...