Wednesday, December 14, 2022

मचाळा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मचाळा

वाचाळांना बघून,
वाचाळ वाचाळू लागले.
कुचाळांना बघून,
कुचाळ कुचाळू लागले.

मागचे तरी कुठे शहाणे?
जरी पुढचे ठेचाळू लागले.
आभाळ फिरल्यासारखे,
सगळेच पिचाळू लागले.

वाचाळकी,कुचाळकी,
गचाळ गचाळू लागले !!
सगळा चालला मचाळा,
जमेल ते मचाळू लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6661
दैनिक पुण्यनगरी
14डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...