Saturday, December 10, 2022

बिनविरोध... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

बिनविरोध

गावो गावच्या पारावरती,
लोकशाहीचे खरे बोध झाले.
ग्रामपंचायत बिनविरोधालाही,
अनेक ठिकाणी विरोध झाले.

बिनविरोधाला विरोध होऊनही,
बिनविरोधाची वार्ता आहे.
लोकशाहीचे कर्म असे की,
बिनविरोधवालाच कर्ता आहे.

बिनविरोध असला तरी,
सरपंच अगदी थेट आहे!
लोक विचारतात लोकांना,
तुमच्याकडे काय रेट आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6658
दैनिक पुण्यनगरी
10डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...