Friday, December 2, 2022

स्वार्थी विचार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

स्वार्थी विचार

सत्यापुढे स्वार्थ,
नेहमीच आडवा येतो.
सत्यापेक्षा स्वार्थापोटी,
माणूस भडवा होतो.

सत्य कुठलेही असो,
शेवटी सत्य हे सत्य असते.
स्वार्थापुढे सगळेच,
मिथ्य एके मिथ्य असते.

स्वार्थाच्या हातात,
स्वार्थाचा हात आहे !
जिकडे तिकडे पसरलेली,
फक्त स्वार्थाची साथ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8112
दैनिक झुंजार नेता
2 डिसेंबर2022

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...