Thursday, December 1, 2022

वल्ली आणि खिल्ली... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

वल्ली आणि खिल्ली

कधी यांची खिल्ली आहे,
कधी त्यांची खिल्ली आहे.
राज्यपाल नावाचा माणूस,
जरा अजबच वल्ली आहे.

व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात,
इथे तर व्यक्ती तेवढी विकृती आहे!
त्यांच्या पाठीराख्यांना,
कुठे त्यांचीच स्वीकृती आहे?

एकदा नाही,दोनदा नाही,
चक्क इजा बिजा तिजा आहे !
पाठीराखे तोंडावर आपटले तरी,
त्यांची हसत खिदळत मजा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8111
दैनिक झुंजार नेता
1 डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...