Thursday, December 1, 2022

लोकशाहीचा डाग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

लोकशाहीचा डाग

जसे लोक,तसे लोकप्रतिनिधी,
असेच प्रकार घडत असतात.
आपले लोकप्रतिनिधी काही,
आभाळातून पडत नसतात.

लोकप्रतिनिधी भ्रष्ट असतील तर,
मतदारसुद्धा भ्रष्ट समजावेत.
ठकास महाठक शोभावेत,
असे एकाहून एक श्रेष्ठ समजावेत.

जे एकमेकांकडे बोट दाखवतात,
त्यांचाच आम्हांला खरा राग आहे!
जरा आपल्या बोटाकडे बघा,
त्यावर लोकशाहीचा डाग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6649
दैनिक पुण्यनगरी
1डिसेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...