Wednesday, December 14, 2022

गावकारण... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

गावकारण

कुठे खतरा धोका,
गावच्या गावपणाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत,
कुणाची प्रतिष्ठा पणाला आहे.

राजकीय प्रतिष्ठेपाई,
गावागावात झुंज आहे.
पारावरच्या मुंजांचीही,
निवडणुकीत मुंज आहे.

गल्लीबोळाचे राजकारण,
म्हणूनच आज तेजीत आहे!
जी पडेल ती किंमत,
प्रत्येकजण आज मोजीत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8122
दैनिक झुंजार नेता
14डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...