Saturday, December 17, 2022

ज्ञान अज्ञान... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

ज्ञान अज्ञान

लोकशाहीची भूल देऊन,
गावच्या गावं भुलवली जातात.
आजकाल गावाच्या बाहेरून,
गावच्या गावं चालवली जातात.

जे कुणी चालक असतात,
तेच खरे गावचे मालक असतात !
ज्यांना हे उघड सत्य समजत नाही,
ते तर अज्ञानी बालक असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8125
दैनिक झुंजार नेता
17डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...