Monday, March 16, 2026

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
पोट निवडणूक
पोटात एक ओठात एक,
तरीही जवळीक वाढली जाते.
पोटनिवडणूक असली की,
ती बिनविरोध काढली जाते.
बिनविरोध तर बिनविरोध,
तीही त्यांच्या नात्यात असते !
घराणेशाहीच्या मार्गाने,
लोकशाही गोत्यात असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 106
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
16 मार्च 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...