Wednesday, March 25, 2026

तफावत...आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
तफावत
गावाकडचे भोंदू बाबा,
कोंबड्या बकरे मोजीत आहेत.
शहरातल्या भोंदू बाबांचे,
धंदे मात्र प्रचंड तेजीत आहेत.
गावाकडच्या भोंदू बाबांची,
ही तर पारंपरिक सल आहे !
गावाकडे चालते देशी दारू,
शहरात मात्र ओश्नो जल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 113
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
25मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...