Wednesday, March 18, 2026

पेपरफुटी....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
पेपरफुटी
पेपरफुटीचा इतिहास पाहता,
कोणताही विषय सुटू शकत नाही.
आपणही दावा न केलेला बरा,
भूगोलाचाही पेपर फुटू शकत नाही.
इतिहास भूगोलाचाही पेपर फुटतो,
याचा अर्थ नागरिक शास्त्र कच्चे आहे!
कॉपी करून का होईना सांगा,
कोण कोणापेक्षा जास्त लुच्चे आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 108
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
18मार्च 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...