Sunday, March 22, 2026

दोस्ताना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
दोस्ताना
राजकारणी आणि भोंदूबाबा,
यांची तशी जुनीच गट्टी आहे.
लोक बारकाईने बघू लागले,
कुणाकुणाच्या बोटाला पट्टी आहे?
कोण कोणाला खेळविते?
कोण मोहरा?कोण सोंगट्या आहेत?
रंगीत संगीत कपाळासोबत,
कुणाकुणाच्या हातात अंगठ्या आहेत.
एखादा भोंदू बुवा बाबा सापडतो,
हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे !
सगळ्यात मोठा जोक म्हणजे,
त्यांचा विरोधकांवरतीच रोख आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9224
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...