Tuesday, March 31, 2026

चौकशी चालू आहे.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चौकशी चालू आहे
खरात नावाच्या भोंदू बाबाचा,
पराक्रम सांगावा तेवढा थोडा आहे.
असे वाटते संपूर्ण महाराष्ट्रालाच,
खरात नावाच्या भोंदूचा वेढा आहे.
चौकशीच्या जात्यातले रडत आहेत,
चौकशीच्या सुपातलेसुद्धा रडत आहेत !
ज्यांच्या ज्यांच्या आड दडायला जावे,
ते ते सगळेच उघडे पडत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 118
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
31मार्च 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...