आजची वात्रटिका
----------------------------
अर्थसंकल्पाचा अर्थ
दादांच्या गुलाबी आठवणीवर,
जणू अर्थसंकल्प फिदा आहे.
जो पूर्ण केल्याचा दावा होतोय,
तो कर्जमाफीचा वादा आहे.
अटीतटीवरती आधारित,
नव्या कर्जमाफीचे चित्र आहे.
शेतकरी विचारतो शेतकऱ्याला,
राजा,तू पात्र की अपात्र आहे ?
नेहमीप्रमाणेच विरोधकांचा,
नकारात्मक असा चेक आहे !
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे,
निव्वळ शाब्दिक फेकाफेक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9209
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 मार्च 2026

No comments:
Post a Comment