आजची वात्रटिका
----------------------------
रांगा एके रांगा
व्यवस्थेने जनतेला मारलेल्या,
फक्त टांगा एके टांगा असतात.
तुम्ही कुठेही गेलात तरी,
फक्त रांगा एके रांगा असतात.
सगळीकडेच धावाधाव करून,
वेळोवेळी रांगावे लागते आहे !
लोकांना दूधखुळे समजल्यामुळे,
वेळोवेळी सांगावे लागते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 103
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
14 मार्च 2026

No comments:
Post a Comment