Sunday, March 8, 2026

आठ मार्चची अपेक्षा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
आठ मार्चची अपेक्षा

ती कधीकधी कोल्ड वाटते,
ती कधीकधी बोल्ड वाटते.
ती कधी कधी जागतिक वाटते,
त्याहीपेक्षा जास्त अगतिक वाटते.
ती कधीकधी वाघीण वाटते,
ती कधी कधी नागिन वाटते.
ती कधीकधी त्रासिक वाटते,
त्याहीपेक्षा जास्त सोशिक वाटते.
तिच्या जगण्यात वागण्यात,
एकदम टोकाचे अंतर दिसू नये!
कुणाला उगीच अबला वाटावे,
एवढेही तिने कधी सोसू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9210
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...