Wednesday, March 18, 2026

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
आत्मनिर्भरतेचे जुगाड
गॅस टंचाईला पर्याय म्हणून,
कसले कसले जुगाड सुरू झाले.
ज्याला काही कळत नाही तेही,
सोशल मीडियामुळे गुरु झाले.
कसल्या कसल्या इंधन तज्ञांची,
सोशल मीडियामुळे चांदी आहे.
गटार म्हणाले गॅसला,
ही आत्मनिर्भर भारताची नांदी आहे.
तरीही जिकडे बघावे तिकडे,
गॅस सिलेंडरसाठी रांग एके रांग आहे !
सामान्य नागरिकांच्या खिशाला,
साठेबाजांकडून टांग एके टांग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9220
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 मार्च 2026

 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...