Thursday, October 15, 2026

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
कठपुतळ्या
ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत,
देव्या त्यांच्या अंगात आहेत.
शिकल्या सवरलेल्यांचे नखरे,
साडीच्या नव्या रंगात आहेत.
सुशिक्षित आणि अशिक्षित,
दोघींच्याही एकच पातळ्या आहेत.
शैक्षणिक फरक असला तरी,
दोघेही पक्क्या कठपुतळ्या आहेत.
असे मात्र कुणी समजू नका,
आमच्या मनात काही अढ्या आहेत !
दिवसा ढवळ्या सत्य सांगतात,
त्या नवरात्रीच्या साड्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9428
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15ऑक्टोबर 2026

 

No comments:

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...