Friday, October 30, 2026

गोंधळात गोंधळ... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------

गोंधळात गोंधळ

उशिरा पाळणा हलूनही,
 बारशाला गोंधळ झाला 
गोंधळात गोंधळाचा,
तमाशा प्रत्यक्षात आला

लग्नपत्रिकेवर आम्ही,
वेगळाच वर पाहिला! 
प्रत्यक्षात मात्र,
दुसराच लग्नाला उभा राहिला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा 
दैनिक पुण्यनगरी 
30 ऑक्टोबर 2004

No comments:

दैनिक वात्रटिका l 30ऑक्टोबर 2026वर्ष- सहावेअंक - 81 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...