Tuesday, October 27, 2026

सावधान... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------

सावधान 

'राष्ट्रपिता’ या पदवीवर
घटनात्मक वाद आहे.
गांधीद्वेष उजाळणे
हा जुनाच नाद आहे.

व्यक्तीद्वेषाच्या भावना
विचारपूर्वक सोडाव्या लागतील !
नाहीतर सर्वच राष्ट्र्पुरूषांच्या
पदव्या काढाव्या लागतील !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा 
दैनिक पुण्यनगरी 
27 ऑक्टोबर 2012

No comments:

मित्रप्रेम.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------- मित्रप्रेम पाकिस्तानला वाटले नव्हते, कॉलिन आपल्याला पावेल. आपली 'छुपी मैत्री' ...