आजची वात्रटिका
----------------------------
कावळ्यांचा दृष्टांत
कावळा म्हणाला कावळ्याला,
अरे बाबा तुझे कुठे लक्ष आहे?
आपल्यासाठी दिवाळी म्हणजे,
भाद्रपदातला पितृपक्ष आहे.
पितृपक्षातल्या देखाव्याला,
आपल्या सर्वांची साक्ष आहे.
तुझ्या माझ्या माध्यमातूनच,
त्यांच्या पितरांना मोक्ष आहे.
अज्ञानातल्या आनंदाला,
तसा खूप मोठा वाव आहे !
गरज सर्व वैद्य मरो,
हाच तर मानवी स्वभाव आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9414
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment