Friday, October 9, 2026

दुष्काळी विचार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
दुष्काळी विचार
कुणाला दुष्काळ नको आहे,
कुणाला दुष्काळ हवा आहे.
आपापल्या मागणीसाठी,
कोरड्या आभाळाकडे दुवा आहे.
उसने अवसान आणून,
कुणी कुणी धीराने जगतो आहे
कुणी कुणी दुष्काळाकडे,
एक संधी म्हणून बघतो आहे.
कुणाच्या नजरेत सुकाळ,
कुणाच्या दुष्काळ दाटला आहे !
आपल्याच करणीमुळे,
निसर्गावरचा विश्वास उठला आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9422
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर 2026

 

No comments:

दुष्काळी विचार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी विचार कुणाला दुष्काळ नको आहे, कुणाला दुष्काळ हवा आहे. आपापल्या मागणीसाठी, कोरड्या आभाळा...