Thursday, October 29, 2026

निवडणूक अतिक्रमण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
निवडणूक अतिक्रमण
कोणत्याही निवडणुका,
कुणीही लढवायला लागले.
लोकशाही जिंदाबाद म्हणीत,
स्वार्थ दडवायला लागले.
घुसखोरांमुळे लाभार्थ्यांचा,
लोकशाही हक्क हिरावला जातो.
लोकशाही मार्गाने लोकशाहीवर,
पोतारा फिरवला जातो.
घुसखोरीच्या राजकारणामुळे,
राजकीय अतिक्रमण वाढते आहे !
पक्षीय हस्तक्षेपामुळे,
सगळे रामायण घडते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9442
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर 2026

 

No comments:

'राम 'बाण उपाय... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------. 'राम 'बाण उपाय दिल्ली आणि मुंबईही गेली,  सगळेच लागले कामाला.  'मी मुंबईकर...