आजची वात्रटिका
----------------------------
आणीबाणीचा भास
कुणी उघड उघड लढू लागले,
कुणी गनिमी काव्याने लढू लागले.
घोषित आणि अघोषित,
आणीबाणीचे प्रकार पडू लागले.
कुणाला आणीबाणीचा भास आहे,
कुणाला आणीबाणीचा वास आहे.
आपला झालेला कोंडमारा बघून,
धोक्यामध्ये लोकशाहीचा श्वास आहे.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
अशीच जिकडे तिकडे अवस्था आहे !
संशयाच्या भोवऱ्यांमध्ये,
कायदा आणि सुव्यवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9425
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर 2026
----------------------

No comments:
Post a Comment