आजची वात्रटिका
----------------------------
प्रबोधनाचा बाजार
भाडोत्री समाज प्रबोधकांमुळे,
समाज प्रबोधनाचे वांधे झाले.
समाज प्रबोधनाच्या बाजारामुळे,
आज समाज प्रबोधनाचे धंदे झाले.
बाजारु समाज प्रबोधन,
ही तर वाऱ्यावरची वरात आहे.
समाज प्रबोधनाचा धंदाही,
इतर धंद्यासारखाच जोरात आहे.
समाज प्रबोधनाचा बाजारु धंदा,
जो तो दिमाखात पेश करतो आहे !
समाजाचे काय व्हायचे ते होवो,
जो तो प्रबोधन कॅश करतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9415
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment