Showing posts with label प्रबोधनाचा बाजार. Show all posts
Showing posts with label प्रबोधनाचा बाजार. Show all posts

Friday, October 2, 2026

प्रबोधनाचा बाजार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
प्रबोधनाचा बाजार
भाडोत्री समाज प्रबोधकांमुळे,
समाज प्रबोधनाचे वांधे झाले.
समाज प्रबोधनाच्या बाजारामुळे,
आज समाज प्रबोधनाचे धंदे झाले.
बाजारु समाज प्रबोधन,
ही तर वाऱ्यावरची वरात आहे.
समाज प्रबोधनाचा धंदाही,
इतर धंद्यासारखाच जोरात आहे.
समाज प्रबोधनाचा बाजारु धंदा,
जो तो दिमाखात पेश करतो आहे !
समाजाचे काय व्हायचे ते होवो,
जो तो प्रबोधन कॅश करतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9415
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 ऑक्टोबर 2026

 

नेतृत्वाचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- नेतृत्वाचे वास्तव एक ना धड भाराभर चिंध्या, अशी नेतृत्वाची तऱ्हा आहे. दगडापेक्षा वीट मऊ ठरवित, त्...