Monday, October 5, 2026

फॉर्म्युल्याचे राजकारण ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
फॉर्म्युल्याचे राजकारण
नवी निवडणूक आली की,
नवा फॉर्म्युला काढला जातो.
नवा पेच निर्माण करून,
नव्या फॉर्मुल्याने सोडला जातो.
राजकीय पेच सुटला तरी,
फॉर्म्युल्याचे समीकरण जुळत नाही.
ज्याला बसला राजकीय फटका,
त्याला तर फॉर्म्युलाच कळत नाही.
पुन्हा नवी निवडणुका आली की,
पुन्हा नवा राजकीय वाद होतो !
कितीही हिट असला तरी,
जुना राजकीय फॉर्म्युला बाद होतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9418
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 ऑक्टोबर 2026

 

No comments:

फॉर्म्युल्याचे राजकारण ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- फॉर्म्युल्याचे राजकारण नवी निवडणूक आली की, नवा फॉर्म्युला काढला जातो. नवा पेच निर्माण करून, नव्य...