Wednesday, October 28, 2026

खरेदी चालू आहे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
खरेदी चालू आहे
निवडणुकीत पैसे वाटले जातात,
निवडणुकीत पैसे लुटले जातात.
सर्वच उमेदवारांना खात्री असते,
शेवटी पैशांनाच पैसे फुटले जातात.
जो तो पैसे वाटत राहतो,
जेवढी त्याची वाटण्याची हिंमत आहे.
प्रत्येक मतदाराची वेगळी किंमत,
ही लोकशाहीतली मोठी गंमत आहे.
जसे पैसे वाटणारे जिंकले जातात,
तसे पैसे वाटणारे हारले जातात !
एकूणच काय तर सगळ्यांकडूनच,
लोकशाहीला खडे चारले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9441
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑक्टोबर 2026

No comments:

खरेदी चालू आहे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- खरेदी चालू आहे निवडणुकीत पैसे वाटले जातात, निवडणुकीत पैसे लुटले जातात. सर्वच उमेदवारांना खात्री असते, श...