आजची वात्रटिका
---------------------
राजकीय अपवाद
स्वाभिमान म्हणून मिरवली जाते,
वास्तवात ती तर लाचारी आहे.
त्याने राजकारणात पडूच नये,
जो स्वाभिमानी आणि विचारी आहे.
जो स्वाभिमानी आणि विचारी,
त्याची सतत आदळ आपट आहे.
राजकारणात तोच टिकू शकतो,
जो कुणी खानदानी लापट आहे.
चार दोन विचारी स्वाभिमान्यांची,
राजकारणाला कायमची याद आहे !
त्यांच्या कर्तृत्वाला दाद दिली तरी,
तो केवळ नियमाला अपवाद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9437
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment