Saturday, October 17, 2026

उत्सव विकृती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
उत्सव विकृती
उत्सवांचे अपहरण करून,
त्यांचे राजकारण होते आहे.
एकाचे बघून दुसऱ्याला,
जास्तच स्फुरण येते आहे.
उत्सवांच्या उदातीकरणाला,
उन्मादाची कीड लागली आहे.
श्रद्धेचा बाजार झाल्यामुळे,
उत्सवांनी सजा भोगली आहे.
उत्सवांच्या विकृतीचे,
अनुभव प्रचंड दाहक आहेत !
कालबाह्य प्रथा परंपरांचे,
उत्सव सुलभ वाहक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9430
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17ऑक्टोबर 2026

 

No comments:

उत्सव विकृती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- उत्सव विकृती उत्सवांचे अपहरण करून, त्यांचे राजकारण होते आहे. एकाचे बघून दुसऱ्याला, जास्तच स्फुरण...