आजची वात्रटिका
----------------
स्फोटास कारण की....
आरोपांचे साखळी बॉम्ब
एकामागे एक फुटत आहेत.
आरोप खरे असो वा खोटे,
आरोप खरे वाटत आहेत.
या घोटाळ्याचे,त्या घोटाळ्याशी
एक अदृश्य साखळी आहे !
स्फोटांमागे स्फोट होण्यास कारण की,
विश्वासाचीच पोकळी आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल.9923847269
--------------------------
फेरफटका l दैनिक झुंजार नेता l 15 ऑक्टोबर 2012
No comments:
Post a Comment