Tuesday, October 6, 2026

छात्रों की गूँज .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
छात्रों की गूँज
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा,
परीक्षे परीक्षेत खुर्दा आहे.
फुटणाऱ्या पेपरमुळे,
आंदोलनांची स्पर्धा आहे.
राजकीय की अराजकीय?
खोचक अशी कॅप्शन आहे.
संविधानिक मार्ग स्वीकारणे,
हाच खरा ऑप्शन आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांना,
छात्रों की गूँज ऐकू गेली पाहिजे!
ज्यांना इशाराही काफी है,
त्यांच्या ती लक्षात आली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9419
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 ऑक्टोबर 2026

 

No comments:

छात्रों की गूँज .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- छात्रों की गूँज विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, परीक्षे परीक्षेत खुर्दा आहे. फुटणाऱ्या पेपरमुळे, आ...