Sunday, October 4, 2026

रील स्टार मतदार संघ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
रील स्टार मतदार संघ
पदवीधर निवडणूक बघून,
जणू रील स्टार बिथरले आहेत.
जिकडे बघावे तिकडे रील स्टार,
उमेदवार म्हणून उतरले आहेत.
लाईक्स आणि फॉलोवर्स,
कॅश करण्यासाठी हे सगळे आहे.
वास्तव आणि आभासी आयुष्य,
हे कितीतरी वेगवेगळे आहे.
रील स्टार्सच्या उत्साह बघून,
सकारात्मक बदल घडला पाहिजे !
यापुढे रील स्टार वाल्यांसाठीही,
स्वतंत्र मतदार संघ काढला पाहिजे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9417
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 ऑक्टोबर 2026

 

No comments:

रील स्टार मतदार संघ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- रील स्टार मतदार संघ पदवीधर निवडणूक बघून, जणू रील स्टार बिथरले आहेत. जिकडे बघावे तिकडे रील स्टार,...