आजची वात्रटिका
----------------------------
बगलबच्चे
फार थोडे सच्चे आहेत,
जास्तीत जास्त लुच्चे आहेत.
जे जे कुणी लुच्चे आहेत,
ते कुणाचे तरी बगलबच्चे आहेत.
आपापल्या बगलबच्च्यांसाठी,
प्रत्यक्ष कायद्यालाही बगल आहे.
जो जो कुणी विरोधात बोलेल,
त्यांच्या मते तो तो पागल आहे.
सच्चे ठरतात पागल,
जणू लुच्चेच तेवढे शहाणे आहेत !
लोकशाहीच्या रक्षणाचे,
बगलबच्च्यांकडून बहाणे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9426
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment