Wednesday, October 7, 2026

गद्दारीचे महाविक्रम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
----------------------------
गद्दारीचे महाविक्रम
राजकीय गद्दारीचे महाविक्रम,
सगळ्यांकडूनच सर आहेत.
जसे गद्दार अडाणी आहेत,
तसे गद्दार पदवीधर आहेत.
शिक्षणाचा आणि गद्दारीचा,
तसा काही ताळमेळ नाही.
एवढे मात्र नक्की आहे,
गद्दारी म्हणजे पोरखेळ नाही.
हपापाचा माल गपापा,
जेव्हा पदरात पोचला जातो !
गद्दारीचा नवा विक्रम,
राजकारणात रचला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9420
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर 2026

No comments:

अध्यात्मिक कावा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अध्यात्मिक कावा ग्लोबल असो वा लोकल, शेवटी बुवा तो बुवा असतो. बुवांची बुवाबाजी म्हणजे, अध्यात्मिक...