Sunday, October 11, 2026

टवाळकी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

टवाळकी

यांच्या पाळ्या झाल्या की,
त्यांच्याही पाळ्या आहेत.
कोणतीही आंदोलने म्हणजे,
हल्ली टिंगल टवाळ्या आहेत.

एकाचे पाहून दुसऱ्याकडून,
टवाळकीचा धडा गिरवला जातो.
हशा टाळ्या आणि टवाळकीत,
मूळ मुद्दा मात्र हरवला जातो.

मुद्द्याने मुद्द्याला खोडण्याची,
नशाच काही आगळी असते !
हास्यविनोद वेगळा असतो,
टिंगल टवाळी वेगळी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9424
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11ऑक्टोबर 2026

 

No comments:

आणीबाणीचा भास....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आणीबाणीचा भास कुणी उघड उघड लढू लागले, कुणी गनिमी काव्याने लढू लागले. घोषित आणि अघोषित, आणीबाणीचे...